अलिगढ – भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्रीय पातळीवरील राजकारणातील उदयाला कॉंग्रेसच जबाबदार असल्याचे एका मुस्लीम संघटनेने म्हटले आहे. ङ्गोरम ङ्गॉर मुस्लीम स्टडिज् ऍन्ड ऍनॅलेसीस असे या संस्थेचे नाव असून या संस्थेचे अध्यक्ष रजाउल्लाखान यांनी हे विधान केले आहे.
एका जाहीर सभेत बोलताना खान यांनी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनाही टीकेचे लक्ष्य केले. राहुल गांधी अतिशय बालीश आणि अपरिपक्वपणा दाखवणारी विधाने करत असतात. याबद्दल खान यांनी त्यांना दोष दिला. मुझफ्ङ्गरनगर येथील दंगलग्रस्त मुस्लीम तरुणांशी पाकिस्तानातील आय.एस.आय. या संघटनेने संपर्क साधला असल्याबद्दलचे राहुल गांधी यांचे विधान हे बालीशपणाचे असल्याचे ते म्हणाले.
कॉंग्रेसच्या उथळ धोरणांमुळे आणि राहुल गांधींच्या अविवेकी विधानांमुळे लोकांचा कॉंग्रेसवरचा विश्वास उडत चालला आहे. त्यातून राजकारणात एक प्रकारची पोकळी निर्माण होत आहे. ती भरून काढण्याची क्षमता अन्य कोणातच नसल्यामुळे तिच्यातच नरेंद्र मोदी यांचा उदय झाला आहे, असे श्री. खान म्हणाले.