राज्यातील जनता पाच दिवस भारनियमनमुक्त

मुंबई: गेल्याु काही दिवसांपासून लोडशेडिंगमुळे त्रासलेल्या राज्यातील जनतेला दिवाळीचा पाच दिवसांचा बोनस मिळाला आहे. राज्याला शुक्रवारपासून पाच दिवस लोडशेडिंगपासून मुक्ती मिळणार आहे. या पाच दिवसाच्याि कालावधीत राज्यासत कुठेच भारनियमन केले जाणार नाही, अशी माहिती महावितरणच्याज सूत्रांनी दिली.

यासाठी केंद्रीय कोटा आणि कोयनेतून ५०० मेगावॅट विजेची तरतूद करण्यात येणार आहे. पण असे असले तरी वीजचोरी आणि अल्पवसुलीमुळे राज्यातील १७ टक्के भागात लोडशेडिंग सुरु राहणार आहे असेही महावितरणकडून यावेळी स्प ष्ट करण्याित आले आहे.

राज्यात लोडशेडिंग मुक्त जाहीर झाल्याने सततच्या भारनियमनाने कंटाळलेल्या जनतेचे दिवाळचे पाच दिवस तरी सुखाचे जाणार आहेत. तसेच पाच दिवस राज्यात अनेक ठिकाणी विजेचा लखलखाट असेल. त्याजमुळे सर्वत्र अतिरिक्ता वीजपूरवठा करावा लागणार आहे. त्या,चा अतिरिक्त ताण महावितरणवर पडणार आहे.

Leave a Comment