पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना अमेरीकेच्या न्यालयाकडून समन्स

वॉशिंग्टन – भारताचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना अमेरिकेच्या न्यालयाकडून समन्स बजावण्यात आला आहे. पंतप्रधान चार दिवसांसाठी अमेरिकेच्या दौर्‍यावर आहेत. शीख नागरिकांच्या हक्कांसाठी लढा देत असलेल्या द शीख फॉर जस्टिस’ या संस्थेने न्यायालयाद्वारे मनमोहन सिंग यांना समन्स बजावले आहे.

सन 1990 मध्ये डॉ. मनमोहनसिंग अर्थमंत्री असताना त्यांनी पंजाबमधील दहशतवाद संपविण्यासाठी सुरक्षारक्षकांसाठी बक्षीस’ योजनेला मंजुरी दिली होती. परंतु, 2004 मध्ये ते पंतप्रधान झाल्यानंतर शीखांविरोधी दंगलीमध्ये सहभागी असलेल्या नेत्यांना त्यांनी वाचविले आहे.

मानवअधिकारे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून डॉ. मनमोहनसिंग यांना येथील न्यायालयाद्वारे समन्स बजावण्यात आले आहे. व्हाइट हाऊसमधील अधिकार्‍यांनी डॉ. मनमोहनसिंग यांच्या सुरक्षारक्षकांकडे हे समन्स दिले आहे. दरम्यान, द शीख फॉर जस्टिस’ या संस्थेने व्हाइट हाऊसच्या बाहेर निदर्शने करण्याची योजना आखली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.