काजोलची अनोखी मोहीम!

वॉशिंग्टन – न्यूयॉर्क शहरात आयोजित संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेनिमित्त आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटनांनी राबवलेल्या स्वच्छता मोहिमेसाठी जगभरातील सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली असून अमेरिकेतील स्वच्छता मोहिमेचे नेतृत्व भारतीय अभिनेत्री काजोल देवगण हिने केले. विकसनशील राष्ट्रांमध्ये आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटनांकडून करण्यात येणा-या प्रयत्नांचा भाग म्हणून विविध विकसित देशांत दैनंदिन आयुष्यातील स्वच्छतेचे महत्त्व प्रतिपादन करणारे विविध उपक्रम राबवले जातात.

आजवर अशा कार्यक्रमांसाठी जनजागृतीची जबाबदारी नोकरशहा आणि तज्ज्ञ मंडळींवर सोपवली जात असत. मात्र नोकरशहांचा काम न करण्याचा उत्साह आणि तज्ज्ञांची कंटाळवाणी पद्धत लक्षात घेता अशा मोहिमांसाठी आता सेलिब्रिटीना सहभागी करून घेण्याची प्रथा सुरू झाली.अभिनेत्री काजोल हिने वॉश युवर हँड्स’ या स्वच्छता मोहिमेत सहभागी होताना लहान मुलांना दररोज हात धुण्याबद्दल माहिती दिली.

यावेळी काजोलसोबत कोलंबिया विद्यापीठातील अर्थ इन्स्टिट्यूट्चे संचालक जेफ्रे सॅच्स, पॉप्युलेशन सव्र्हिसेसचे अध्यक्ष आणि मुख्यकार्यकारी अधिकारी कार्ल हॉफमन,युनिलिव्हरचे मुख्य कार्यकारी अधिकारी पॉल पोलमॅन,लाईफबॉय ग्लोबलचे प्रतिमा संचालक पवनजित सिंघ बेदी यांनीही या मोहिमेत सहभाग घेतला. या टीमने काढलेल्या मोहिमेनंतरच्या परिषदेत सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील खाजगी क्षेत्राचा सहभाग वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला.विकसित देशांबरोबरच अनेक विकसनशील देशांतही संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लहान मुलांना हात स्वच्छ धुण्याचे प्रशिक्षण दिले जाते.

Leave a Comment