
आपल्या फिटनेससाठी अभिनेत्री दिशा पटानी ही ओळखली जाते. ती कायमच सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक फोटो चाहत्यांच्या भेटीला आणत असते. दिशाच्या सौंदर्याला कमनीय बांधा आणि मादक अदा हे जणू चार चाँद लावतात. सध्याही ही सौंदर्यवती तिच्या अशाच एका लूकमुळे प्रकाशझोतात आहे.
दिशाच्या ‘Pink Bikini’वर घायाळ झाला ‘टायगर’
दिशाने नुकताच तिचा गुलाबी रंगाच्या बिकीनीमधील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ती यामध्ये सनबाथ घेताना दिसत आहे. दिशाचा हा फोटो आणि तिच्या अदा पाहून नेटकऱ्यांच्या काळजाचा ठोकाच चुकत आहे. अगदी अभिनेता आणि दिशाचा कथित प्रियकर टायगर श्रॉफही यातून वाचू शकलेला नाही.
समुद्रकिनारी सनबाथ घेणाऱ्या दिशाचे सौंदर्य पाहून टायगरही त्यावर प्रतिक्रिया देण्यापासून स्वत:ला थांबवू शकला नाही. मोकळे केस, गुलाबी रंगाची बिकीनी आणि डोक्यावर हॅट असे दिशाचे सौंदर्य पाहून त्याने, ‘हॉट’ असे लिहित फोटोवर कमेंट केली. सोबतच त्याने आगीचे इमोजीही जोडले आहे.
टायगरने दिशाच्या फोटोवर केलेली ही कमेंट पाहता पुन्हा एकदा या सेलिब्रिटी जोडीच्या केमिस्ट्रीने चाहत्यांचे लक्ष वेधले. दिशा आणि टायगर मागील बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटले जात आहे. असे असले तरीही, या दोघांपैकी कोणीही त्यांच्या या नात्याची अधिकृत ग्वाही दिलेली नाही. पण, ही प्रेमकहाणी कोणापासूनही लपलेली नाही हे देखील तेवढेच सत्य आहे.
