महेंद्रसिंह धोनीची हटवलेली ‘ब्लू टीक’ ट्विटरने पुन्हा बहाल केली


मुंबई – भारतीय क्रिकेट संघाचा कॅप्टनकूल अर्थात माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीचे देशभरात असंख्य चाहते आहेत. आयपीएलमध्ये धोनी चेन्नई सुपर किंग्ज या संघाचे नेतृत्त्व करतो. त्यामुळे धोनीने आंतराराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी त्याच्यासंदर्भात कायम चर्चा होत असते. पण अशातच चर्चेत असणाऱ्या धोनीला ट्विटरने धक्का दिला आहे.

धोनीची ब्लू टीक ट्विटरने हटवली होती. ट्विटरने धोनीची ब्लू टीक काढल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. कारण ट्विटरवर धोनीचे जवळपास 80 लाखांच्यावर फॉलोअर्स असल्यामुळे ट्विटरने नेमकी कोणत्या कारणामुळे धोनीची ब्लू टीक हटवली याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. पण आता ट्विटरने धोनीला ब्लू टीक पुन्हा बहाल केली आहे.

ब्ल्यू टिक असलेले अकाऊंट हे वेरिफाईड आणि ऑथेनटिक समजले जाते. ट्विटरकडून नामवंत व्यक्तींच्या अकाऊंटला ब्ल्यू बॅज दिला जातो. गेल्या काही दिवसांपूर्वी ट्विटरने भारतातील मोठ्या नेत्यांच्या अकाऊंटची ब्ल्यू टिक हटवली होती.

दरम्यान, धोनी ट्विटरवर सुरूवातीला ट्विटरवर सक्रीय असलेला पाहायला मिळायचा. पण 2018 नंतर त्याने ट्विट करणे कमी केले. मागील वर्षी धोनीने सोशल माध्यामांवरून आपल्या निवृत्तीची घोषणा केली होती.