नवी दिल्ली- दोन दिवसांपूर्वी एका कार्यक्रमप्रसंगी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी प्रचारावर आठ कोटी रुपये खर्च केल्याचे जाहीर वक्तव्य करणारे भाजप नेते गोपीनाथ मुंडे संकटात सापडले आहेत. निवडणूक आयोगाने त्यांच्या या वक्तव्याची गंभीर दखल घेतली आहे. येत्या काळात निवडणूक आयोग त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याची तयारी करत आहे. जनप्रतिनिधी कायद्याखाली मुंडे यांना नोटीस बजावण्यात येणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.
यामुळे येत्या काळात मुंडे यांचे वक्तव्य सिध्द झाले तर, त्यांची खासदारकी तर धोक्यात येण्यानची शक्ययता आहे. त्याचबरोबर पुढील तीनवर्षांपासाठी त्यांच्या निवडणूक लढवण्यावरही बंदी येऊ शकते. म्हणजेच त्यांना पुढची २०१४ सालची लोकसभा निवडणूक लढवता येणार नाही.सार्वत्रिक निवडणूकीत केवळ २५ लाख रुपये खर्च करण्याची मर्यादा आहे. असे असतानाही मुंडे यांनी आठ कोटी रुपये खर्च केले.
आगामी निवडणूकीला आता फक्त आठ ते नउ महिने शिल्लक आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगा आता त्यांच्यावर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.