भारताच्या उद्योगनीतीवर अमेरिकन लॉ मेकर नाराज

वॉशिग्टन दि.२९ – अमेरिकेतील वरीष्ठ सांसद ( लॉ मेकर्स) नी भारताच्या उद्योग व्यवसाय नीतीवर कडक टिका केली असून नवी दिल्ली नियमांनुसार वागण्यास उत्सुक नसल्याचे म्हटले आहे.

अमेरिकन काँग्रेस बैठकीत या विषयी बोलताना वरीष्ठ सांसद मार्शा ब्लॅकबर्न म्हणाल्या की जेव्हा आपण भारताच्या औद्यागिक धोरणांबाबत आणि उद्योग व्यवसाय नीतीबाबत विचार करतो तेव्हा उद्योगात अडथळे आणणे, प्रचंड प्रमाणावर सुरू असलेली पायरसी, कर रचनेतील भेदभाव आणि आपल्या बौद्धिक संपदा अधिकारांचा अनादर हेच आपल्याला दिसून येते. भारत असा एक देश आहे की जो नियमांनुसार वागायला तयार नाही.

ब्लॅकबर्न पुढे म्हणल्या की सर्वात विशेष म्हणजे भारत आपली ही वागणूक लपवू पाहतो. उदाहरण द्यायचे झाले तर गेल्याच आठवड्यात भारतीय राजदूतांकडून माझ्या कार्यालयाकडे पत्र आले आहे. त्यात अमेरिकेत लाखो लोकांचे रोजगार ज्यामुळे जात आहेत त्या वर्तणुकीचा भारताकडून बचाव केला जात आहे असे लक्षात आले आहे.

लियोनार्ड लान्स या दुसर्‍या लॉ मेकरनीही बौद्धिक संपदा अधिकारासंबंधीची भारताची नीती चिंता करण्यासारखी असल्याचे मत व्यक्त केले आहे. त्यामुळे अमेरिकेने आता बौद्धिक संपदा अधिकार क्षेत्राबाबत आपल्या नेतृत्त्वाचे प्रदर्शन करणे आवश्यक बनले आहे असेही ते म्हणाले.

Leave a Comment