नवी दिल्ली, दि.१५ -पाकिस्तानात सरकार स्थापन करण्यास पीएमएल-एन हा पक्ष सज्ज झाला आहे. या पक्षाचे प्रमुख नवाज शरीफ पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. आपल्या शपथविधी सोहळ्यासाठी भारताचे पंतप्रधान मनमोहनसिंग यांना निमंत्रित करणे आनंददायी ठरेल, असे शरीफ यांनी कालच म्हटले होते. मात्र, शरीफ यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याचे अधिकृत निमंत्रण सिंग यांना मिळाले नसल्याचे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून आज स्पष्ट करण्यात आले. विशिष्ट सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचा विशिष्ट प्रस्ताव पंतप्रधानांना मिळाला नसल्याचे यासंदर्भात परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले.
