नवी दिल्ली – आपल्यापैकी अनेकांना गोमूत्र आणि शेणाचे फायदे माहितीच आहेत. पण, आता चक्क गायीच्या शेणापासून अँटी रेडिएशन चिप तयार करण्यात आली असून मोबाईलसाठी ही चिप वापरता येणार आहे. हे आजारांविरोधात ढाल असल्याचा दावा कामधेनू आयोगाने केला आहे.
#WATCH: Cow dung will protect everyone, it is anti-radiation… It's scientifically proven…This is a radiation chip that can be used in mobile phones to reduce radiation. It'll be safeguard against diseases: Rashtriya Kamdhenu Aayog Chairman Vallabhbhai Kathiria (12.10.2020) pic.twitter.com/bgr9WZPUxK
— ANI (@ANI) October 13, 2020
गायीच्या शेणापासून अँटी रेडिएशन चिप बनवल्याचा दावा कामधेनू आयोगाने केला आहे. सगळ्यांना गायीचे शेण सुरक्षित ठेवेल. गायीचे शेण हे रेडिएशन विरोधी असल्याचे वैज्ञानिकरित्या सिद्ध झालेले आहे. रेडिएशन कमी करण्यासाठी गायीच्या शेणापासून बनवलेली अँटी रेडिएशन चिप मोबाईलमध्येही वापरता येऊ शकते. आजारांविरोधात हे एक प्रकारे सुरक्षा कवच असल्याचा दावा कामधेनू आयोगाचे अध्यक्ष वल्लभभाई कठीरिया यांनी केला आहे.
याबाबत माहिती देताना कथीरिया म्हणाले, रेडिएशन कमी करण्यात गायीच्या शेणापासून मदत होते. ही एक अँटी रेडिएशन चिप आहे. आम्हाला असे दिसून आले आहे की, मोबाईलमध्ये ही चिप ठेवल्यास रेडिएशन कमी होते. जर आजारांपासून तुम्हाला दूर राहायचे असेल, तर याचा वापर करू शकता. गौसत्व कवच असे या अँटी रेडिएशन चिपचे नाव असून राजकोटमधील श्रीजी गौशाळेत ही चिप तयार करण्यात आलेली आहे.