नवी दिल्ली: काही दहशतवादी संघटना भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करीत असल्याची माहिती भारतीय गृह विभागाकडे असून त्याबद्दल ‘इंटरपोल’ला माहिती देण्यात आली आहे; अशी माहिती गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिली.

गुप्तचर यंत्रणेकडे जमात उद दवा ही संघटना भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करीत असल्याची माहिती असल्याबद्दल शिंदे यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी कोणत्याही संघटनेचे नाव सांगण्यास नकार दिला. मात्र दहशतवादी संघटना अशी गुंतवणूक करीत असल्याच्या माहितीला त्यांनी दुजोरा दिला. रोम येथे पार पडलेल्या इंटरपोलच्या बैठकीत याबाबत चर्चा आणि माहितीची देवाण घेवाण झाल्याचेही त्यांनी सांगितले.
आसाममध्ये अद्याप घडून येणाऱ्या हिंसक प्रकारांबाबत पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांच्याशी चर्चा केली असल्याचे सांगून शिंदे यांनी आसाममधील निर्वासितांची संख्या ५ लाखावरून २४ हजारापर्यंत घटल्याचा दावाही केला.