बाळासाहेबांसाठी शिवसैनिक हेच टॉनिकः खा. राऊत

मुंबई: शिवसेनाप्रमुखांसाठी शिवसैनिक हेच टॉनिक असून त्याच उर्जेच्या सहाय्याने बाळासाहेब ठाकरे पुन्हा त्याच शक्तीने उभे रहातील आणि शिवसैनिकांना लवकरंच दर्शन देतील; असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.

शुक्रवारी संध्याकाळी ‘मातोश्री’च्या बाहेर राऊत यांनी पत्रकारांना शिवसेना प्रमुखांच्या तब्येतीबाबत माहिती दिली.

बाळासाहेब हे दैवी अवतार असून आम्हा शिवसैनिकांसाठी ते दैवत आहेत. त्यामुळे शिवसैनिकांना त्यांच्या प्रकृतीबिषयी कळजी वाटणे स्वाभाविक आहे. मात्र शिवसैनिकांचे प्रेम आणि सदिच्छांच्या जोरावर ते बरे होतील; असा विश्वास राऊत यानी व्यक्त केला.

Leave a Comment