नवी दिल्ली: गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची लोकसभेच्या सभागृहनेतेपदी नियुक्ती करण्यात आल्याचे अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आले.

नवी दिल्ली: गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची लोकसभेच्या सभागृहनेतेपदी नियुक्ती करण्यात आल्याचे अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आले.
पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी शिंदे यांची नियुक्ती केल्याचे संसदीय कामकाज मंत्री पवन बन्सल यांनी शुक्रवारी जाहीर केले.
मागासवर्गीय व्यक्तीला पुन्हा एकदा हा सन्मान दिल्याबद्दल शिंदे यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली.