विजय कुमारने लुटली ‘चांदी’

लंडन: भारतीय नेमबाज विजय कुमार याने २५ मीटर पिस्तूल नेमबाजी स्पर्धेत देशाला रौप्य पदक मिळवून देत इतिहास घडविला. त्याने ३० गुण प्राप्त केले. क्युबाला पहिले सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्यां ल्युरीस पुपोने ३५ गुण मिळविले.

वूकाय कुमारपेक्षा केवळ एक गुण कमी मिळालेल्या चीनच्या डिंग फेंग याला कास्य पदकावर समाधान मानावे लागले.

अथेन्स ऑलिम्पिक नेमबाजी स्पर्धेत राजवर्धन सिंह राठोड याने डबल ट्रेप प्रकारात रौप्य पदक पटकाविले होते. त्यानंतर अशी कामगिरी करणारा विजय कुमार हा दुसरा नेमबाज ठरला आहे.