कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लागू असलेल्या लॉकडाऊन सिनेसृष्टीचे हजारो कोटींचे नुकसान होत आहे. पण हे नुकसान टाळण्यासाठी चित्रपट निर्माते ओटीटी प्लॅटफॉर्मचा आधार सध्या घेत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. कारण कालच आम्ही तुम्हाला अभिनेते अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुराणा यांचा आगामी गुलाबो सिताबो हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार असल्याची बातमी दिली होती. त्यानंतर आता बॉलीवूडचा आणखी एक चित्रपट अॅमेझॉन प्राइमवर रिलीज होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
IT'S OFFICIAL… #ShakuntalaDevi – starring #VidyaBalan and #SanyaMalhotra – to premiere on #Amazon Prime Video… Directed by Anu Menon… Produced by Sony Pictures Networks Prod and Abundantia Entertainment. #ShakuntalaDeviOnPrime pic.twitter.com/dVDu4wYUZ8
— taran adarsh (@taran_adarsh) May 15, 2020
आता अॅमेझॉन प्राइमवर अभिनेत्री विद्या बालनचा आगामी ‘शकुंतला देवी’ हा चित्रपट रिलीज होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विद्या बालनने या चित्रपटामध्ये शकुंतला देवी यांची व्यक्तीरेखा साकारली आहे. ‘शकुंतला देवी’ हा चित्रपट अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार असल्याची माहिती चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी दिली असली तरी त्यांनी अद्याप चित्रपट कधी रिलीज होणार याची तारीख सांगितलेली नाही.
प्रसिद्ध गणितज्ञ शकुंतला देवी यांच्या जीवनावर आधारित विद्या बालनचा हा चित्रपट आहे. विद्या बालनसोबत या चित्रपटात सान्या मल्होत्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. शकुंतला देवी यांच्या मुलीची भूमिका सान्या साकारणार आहे. त्याचबरोबर अमित साध आणि जिस्शु सेनगुप्ता देखील महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनु मेनन यांनी केले आहे. या पूर्वी अमिताभ बच्चन आणि आयुष्यमान खुराना यांचा ‘गुलाबो सिताबो’ अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार असल्याची घोषणा करण्यात आली. हा चित्रपट १२ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.