
नवी दिल्ली – दिल्लीतील क्वारंटाइन सेंटरमध्ये तबलिगी जमातच्या काही लोकांना ठेवण्यात आले आहे. पण तेथील वैद्यकीय कर्मचाऱ्यांना या तबलिगींमुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. दिल्लीतील क्वारंटाइन सेंटरमधील एक किळसवाणा प्रकार नुकताच समोर आला आहे. या ठिकाणी काम करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना त्रास देण्यासाठी ज्या ठिकाणी तबलिगींना ठेवण्यात आले आहे, त्याच्याच समोर काहींनी शौच केल्याचा किळसवाणा प्रकार घडला आहे. यानंतर याविरोधात दिल्लीतील नरेला येथील क्वारंटाइन सेंटरकडून एक एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
हा एफआयआर ज्या दोन लोकांविरोधात दाखल केला आहे, ते दिल्लीतील निझामुद्दीन येथे पार पडलेल्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. सध्या दिल्लीतील नरेला सेंटरमध्ये त्यांना ठेवण्यात आले आहे. वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कोणतीही गोष्ट एफआयआर दाखल करण्यात आलेले दोन जण ऐकत नसल्यामुळे या ठिकाणी असलेल्या अन्य लोकांनाही धोका निर्माण होऊ शकतो, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
क्वारंटाईन सेंटरमध्ये असलेल्या तबलिगींचा किळसवाणा प्रकार, एफआयआर दाखल
तबलिगींना ठेवण्यात आलेल्या ठिकाणांपैकी २१२ नंबरच्या खोली बाहेर संपूर्ण परिसराचे सॅनिटाझेशन करताना काही तबलिगींनी शौच करण्यासारखा किळसवाणा प्रकार केल्याचे या एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्याचबरोबर त्या दोघांची नावेही देण्यात आली आहेत.
