राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि राज्यसेवा संयुक्त परीक्षा काही काळासाठी स्थगित


मुंबई – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) राज्यातील करोनाचा दिवसेंदिवस वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि राज्यसेवा संयुक्त परीक्षा काही काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

आयोगाकडून या संदर्भात जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात, कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या अनुषंगाने दिनांक 22 मार्च 2020 रोजीच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिनांक 26 एप्रिल 2020 व 10 मे 2020 रोजी नियोजित अनुक्रमे राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 व महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब, संयुक्त पूर्व परीक्षा 2020 या दोन्ही सार्वजनिक हितास्तव पुढे ढकलण्यात येत असल्याचे म्हटले आहे.

आयोगाच्या संकेतस्थळावर दोन्ही परीक्षा आयोजनासंदर्भात सुधारित दिनांक घोषित करण्यात येतील. तसेच परीक्षेची दिनांक निश्चित झाल्यानंतर उमेदवारांना त्यांच्या आयोगाकडील नोंदणीकृत दूरध्वनी क्रमांकावर एसएमसद्वारे कळविण्यात येणार आहे. उमेदवारांनी वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळाचे अवलोकन करणे उमेदवारांसाठी हितकारक राहील असेही सांगण्यात आले आहे.

Leave a Comment