दिलासादायक! पुण्यात 24 तासांत 5 जण कोरोनामुक्त


पुणे – राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात वाढ होत असतानाचा पुणे जिल्ह्यातून एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. पुण्याच्या नायडू रुग्णालयात आणखी तिघांची प्रकृती सुधारली असून त्यांनादेखील डिस्चार्ज देण्यात आला आहे.

या रुग्णांना डिस्चार्ज देण्याअगोदर काल पुण्यातील पहिल्या कोरोनाबाधित दाम्पत्याला डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर तीन रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांनाही डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे नायडू रुग्णालयातून आज पाच रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पहिल्या कोरोनामुक्त दाम्पत्याच्या सहवासातील तीनही रुग्ण आहेत. एक या दाम्पत्याची मुलगी, दुसरा या दाम्पत्याच्या टॅक्सीचा चालक आणि तिसरा यांचा सहप्रवासी आहे. दरम्यान, भारतातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा वाढला आहे. एकूण 606 रुग्ण कोरोनाव्हायरसच्या विळख्यात आहे. त्यापैकी 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक 122 रुग्ण आहेत.