पोलिसांनी शेअर केलेले राशी भविष्य वाचल्यावर तुम्ही घरातून बाहेर पडणे बंद कराल

कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी व याचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन केले जात आहे. नागरिकांनी घरातून बाहेर पडू नये यासाठी 21 दिवस लॉकडाऊनचा निर्णय देखील सरकारने घेतला आहे. मात्र असे असताना देखील काही लोक विनाकारण बाहेर फिरताना दिसत आहेत.

अशाच बाहेर फिरणाऱ्यांसाठी मुंबई पोलिसांद्वारे एक खास राशी भविष्य शेअर करण्यात आले आहे. हे राशी भविष्य वाचवल्यावर तुम्ही घरातून बाहेर फिरणे बंद कराल.

मुंबई पोलिसांनी शेअर केलेल्या या भविष्यामध्ये सर्व 12 राशींमध्ये सर्वांसाठी एकच भविष्य सांगण्यात आले आहे. या सर्व राशींमध्ये एकच गोष्ट सांगण्यात आली आहे, ती म्हणजे घरातच राहा.

मुंबई पोलिसांनी हे राशी भविष्य शेअर करताना लिहिले की, जर तुम्ही या राशी भविष्याचे पालन केले तर निश्चितच तारे निश्चितच तुमच्या बाजूने असतील.

नागरिकांना घरातून बाहेर न पडण्यासाठी मुंबई पोलिसांनी हटके पद्धतीने केलेले आवाहन नेटकऱ्यांना देखील आवडले आहे.

Leave a Comment