
महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाने रंगभूमीवरचे नटसम्राट अशी ज्यांची ओळख होती ते दिवंगत ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू पुरस्कार यांच्या नावे दिला जाणार असल्याची घोषणा केली आहे.
नटसम्राटांच्या नावाने महाराष्ट्र सरकार देणार पुरस्कार
डिसेंबर २०१९ मध्ये श्रीराम लागू यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांची रंगभूमीवरचा नटसम्राट म्हणून ओळख होती. त्याचबरोबर त्यांना अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ म्हणून देखील ओळखले जायचे. त्यांनी रंगभूमी, चित्रपटसृष्टी यामध्ये दिलेले योगदान मोलाचे आहे. महाराष्ट्र सरकारने त्यांच्या याच योगदानाचा गौरव करण्यासाठी त्यांच्या नावाने पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. नटसम्राट श्रीराम लागू पुरस्कार देऊन रंगभूमीवर अतुलनीय कामगिरी करणाऱ्या कलाकाराला यापुढे गौरवले जाणार आहे.
