अशा प्रकारे मिळवू शकता व्हीआयपी नंबर

आज मोबाईलमुळे कोणीही नंबर लक्षात ठेवत नाही. मात्र आता फोन नंबरचे महत्त्व अधिक वाढले आहे. बँकिंगपासून ते आधार कार्डपर्यंत सर्वच गोष्टींसाठी मोबाईल नंबर आवश्यक आहे. अनेकजण मोबाईल नंबरची निवड करताना सहज लक्षात राहील, असा सोपा नंबर निवडत असतात. मात्र आपल्याला हवा तसा व्हीआयपी नंबर मिळत नाही. मात्र आता व्होडाफोन आणि बीएसएनएलने एक खास सेवा सुरू केली असून, याद्वारे तुम्हाला तुमच्या आवडीचा नंबर सहज मिळेल.

बीएसएनएल प्रिमियम नंबर –

बीएसएनएलचा प्रिमियन नंबर घेण्यासाठी तुम्हाला http://eauction.bsnl.co.in/auction1/eauction.aspx वर जावे लागेल. येथे तुम्हाला तुमचे राज्य निवडावे लागेल. यानंतर तुम्हाला काही नंबर दिसतील, ज्यातील तुम्ही तुमच्या आवडीचा निवडू शकता. येथे तुम्हाला 0000, 1111, 2211 आणि 2121 सारख्या नंबरची सीरिज दिसेल.

नंबर निवडल्यानंतर तुम्हाला तुमचा नंबर द्यावा लागेल. यानंतर तुम्हाला एक पिन येईल. पिन आणि नंबरची फी भरल्यानंतर तुमच्या आवडीचा नंबर तुमच्या नावावर रजिस्टर होईल. यानंतर कागदपत्रे कस्टमर केअर सर्व्हिसेजमध्ये जमा करावे लागतील.

व्होडाफोन प्रिमियम नंबर –

व्होडाफोनचा प्रिमियम नंबर घेण्यासाठी तुम्हाला https://buyonline.vodafone.in/new-connection/choose-your-fancy-mobile-numbers-online या साईटवर जावे लागेल. तेथे नाव, नंबर आणि राज्य याची माहिती द्यावी लागेल. यानंतर तुम्हाला 399 आणि 499 रुपयांचे पोस्टपेड प्लॅन दिसतील. यातील एक प्लॅन निवडल्यानंतर तुमच्या समोर फ्री आणि प्रिमियम नंबरची यादी येईल. यातील नंबर निवडल्यानंतर तुम्हाला तुमची खाजगी माहिती द्यावी लागेल. त्यानंतर पेमेंट केल्यावर तुमच्या आवडीचा नंबर तुम्हाला मिळेल.

Leave a Comment