ऑस्कर विजेत्या अभिनेत्याने दान केली 444 कोटींची संपत्ती

तीन वेळा ऑस्कर विजेते हॉलिवूड स्टार कर्क डग्लस यांनी मृत्यूआधी आपली संपुर्ण संपत्ती जवळपास 444 कोटी रुपये (6.1 कोटी डॉलर) वेगवेगळ्या संस्थांना दान केली आहे. खास गोष्ट म्हणजे त्यांचा मुलगा मायकल डग्लस यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला संपत्तीमधील एकही रुपया देण्यात आलेला नाही. अद्याप जवळपास 80 कोटी रुपये कोणाला दिले जाणार आहेत, याची घोषणा बाकी आहे.

डग्लस यांनी आपल्या मुलाला काहीच दिले नाही. यावर कर्क यांनी लिहिले की, 2020 पर्यंत मायकलकडे जवळपास 300 कोटी डॉलर (21,860 कोटी रुपये) संपत्ती आहे. त्यामुळे मला वाटत नाही की, त्याला माझ्या पैशांची गरज असेल.

कर्क डग्लस यांनी आपल्या संपत्तीमधील 364 कोटी रुपये डग्लस फाउंडेशनला दान केले आहेत. या व्यतिरिक्त सेंटल लॉरेंस यूनिवर्सिटी, सिनाई टेंपल, कर्क डग्लस थेअटर आणि लॉस एंजेलिंसमधील चिल्ड्रन हॉस्पिटलला मोठी रक्कम दान करण्यात आली आहे.

मायकल व्यतरिक्त कर्क डग्लस यांच्या कुटुंबात त्यांची दुसरी पत्नी एनी आणि जोएल व पीटर ही दोन मुले आहेत. 5 फेब्रुवारी 2020 ला कर्क यांचे वयाच्या 103 व्या वर्षी निधन झाले.

Leave a Comment