भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या टी20 विश्वचषकाच्या निमित्ताने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. स्पर्धेत भारताने आतापर्यंत शानदार कामगिरी करत उपांत्य फेरीत देखील प्रवेश केला आहे. मात्र यासोबतच भारतीय महिला खेळाडू सेलिब्रेशन करताना देखील दिसत आहेत.
भारतीय क्रिकेटरचा सिक्युरिटी गार्डसोबतचा डान्स व्हिडीओ व्हायरल
भारतीय महिला संघातील युवा क्रिकेटर जेमिमा रॉड्रिग्जचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये 19 वर्षीय जेमिमा चक्क बॉलिवूड गाण्यावर सिक्युरिटी गार्डसोबत डान्स करताना दिसत आहे. दोघीही कार्तिक आर्यन आणि सारा अली खानच्या ‘लव्ह आज कल’ चित्रपटातील ‘ट्विस्ट’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.
Yes, @JemiRodrigues! 💃💃
Busting moves with an off-duty security guard at the #T20WorldCup pic.twitter.com/ehUdGQc3QV
— ICC (@ICC) February 27, 2020
जेमिमाचा सिक्युरिटी गार्डसोबतचा डान्स व्हिडीओ आयसीसीने देखील शेअर केला.
We've got moves! @JemiRodrigues 💃💃
— The Bharat Army (@thebharatarmy) February 27, 2020
Jemi, you're a rockstar! 🌟
— North Stand Gang – Wankhede (@NorthStandGang) February 27, 2020
या व्हिडीओला आतापर्यंत 5 लाखांपेक्षा अधिक वेळा पाहण्यात आले असून, नेटकरी देखील त्यांच्या डान्सचे कौतूक करत आहेत.
जेमिमाने स्पर्धेत आतापर्यंत चांगली कामगिरी केली असून, तिने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात 26 धावा, त्यानंतर बांगलादेशविरुद्ध 34 धावा आणि न्यूझीलंडविरुध्द 10 धावा केल्या होत्या.
