‘ओप्पो ए31’ स्मार्टफोन भारतात लाँच

चीनी स्मार्टफोन कंपनी ओप्पोने भारतात एक नवीन स्वस्तातला स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने दोन व्हेरिएंटमध्ये ओप्पो ए31 (2020 ) लाँच केला आहे.

या फोनमध्ये 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंट मिळेल. या व्हेरिएंटची किंमत 11,490 रुपये आहे. तर टॉप व्हेरिएंट 6 जीबी + 128 जीबी इंटर्नल स्टोरेज असून, याची किंमत 13,990 रुपये आहे.

Image Credited – NDTV

या फोनच्या सुरूवातीच्या व्हेरिएंटची विक्री 29 फेब्रुवारीपासून सुरू होईल. तर टॉप व्हेरिएंटची विक्री मार्चच्या अखेरीस सुरू होईल. हा फोन मिस्ट्री ब्लॅक आणि फँटसी व्हाइट रंगात खरेदी करता येईल. याची विक्री ऑनलाईन व ऑफलाईन होईल.

ओप्पो ए31 स्मार्टफोनमध्ये 6.5 इंच एचडी डिस्प्ले मिलेल. यासोबतच यात मीडियाटेक हेलिओ पी35 प्रोसेसर देण्यात आलेला आहे.

Image Credited – Smartprix

कॅमेऱ्याबद्दल सांगायचे तर या फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा देण्यात आलेला आहे. प्रायमेरी लेंस 12 मेगापिक्सल असून, इतर दोन कॅमेरे हे 2-2 मेगापिक्सल आहेत. तसेच सेल्फीसाठी यात 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा मिळेल.

कंपनीने यात 4,230 एमएएचची बॅटरी दिली आहे. कंपनीने दावा केला आहे की, फुल चार्जमध्ये ही बॅटरी पुर्ण दिवस चालेल. कनेक्टिव्हिटीसाठी यात 4जी वोल्ट, वाय-फाय, ब्लूटूथ व्ही5.0 सारखे स्टँडर्ड फीचर्स मिळतील. यात 3.5 एमएम हेडफोन जॅक आणि रिअर फिंगरप्रिंट स्कॅनर देखील देण्यात आले आहे.

Leave a Comment