भारतात कोरोनाच्या प्रसाराची शक्यता – अमेरिकन गुप्तचर संस्था

अमेरिकन गुप्तचर संस्था जगभरात पसरत चाललेल्या कोरोना व्हायरस आणि तेथील सरकारची तेथील हातळण्याच्या क्षमतेवर लक्ष ठेऊन आहेत. याविषयी माहिती असलेल्या सुत्रांनी सांगितले की, या व्हायरसच्या उद्रेकाचा भारत कसा सामना करणार याविषयी चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

भारतात अद्याप काही मोजकीच कोरोना व्हायरसची प्रकरणे आढळली आहेत. मात्र सुत्रांनुसार, भारतातील या व्हायरसला हातळण्याची क्षमता आणि तसेच लोकसंख्येमुळे व्हायरस पसरण्याची भिती अधिक आहे.

अमेरिकन गुप्तचर संस्था इराणवर देखील लक्ष ठेऊन आहेत. इराणमध्ये उपआरोग्य मंत्र्यांनाच या व्हायरसने ग्रासले आहे. अमेरिकेचे सेक्रेटरी ऑफ स्टेट माईक पॉम्पेओ यांच्यानुसार, इराणने या पसरलेल्या व्हायरसचा तपशील लपवला असण्याची शक्यता आहे. इराणकडे या व्हायरसचा सामना करण्यास सक्षम अशी यंत्रणा नाही, त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

यासोबतच काही विकासशील देशांमध्ये ज्या असक्षमपणे कोरोना व्हायरसशी सामना करण्यात येत आहे, त्याबाबत देखील अमेरिकन गुप्तचर संस्थेने चिंता व्यक्त केली आहे.

Leave a Comment