कहरच ! मुलीने चक्क तंदूरी चिकन चहामध्ये बुडवून खाल्ले

काही दिवसांपुर्वीच एका व्यक्तीचा इडली चहामध्ये बुडवून खातानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. भारतात सर्वसाधारणपणे इडली सांभरबरोबर खातात. त्यामुळे चहामध्ये इडली बुडवून खाणाऱ्या या व्यक्तीवर लोकांनी भरपूर टीका केली. आता असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक मुलगी चक्क तंदूरी चिकन चक्क चहामध्ये बुडवून खात आहे.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक मुलगी कपात तंदूरी चिक्कन टाकते आणि त्यावरती चहा टाकते. त्यानंतर चमचा घेऊन मजेत तंदूरी चिकन टिक्की खाते. लोकांना हा व्हिडीओ अजिबात आवडला नाही व ते या मुलीवर चांगलेच भडकले.

रेडिट युजरने व्हिडीओ शेअर करत लिहिले की, मित्रांनो, जेव्ही मी चहा आणि इडलीचा व्हिडीओ पोस्ट केला, तेव्हा तुम्ही सांगितले होते की चिकन लेग पीस आणि चहा एकदा टेस्ट कर. मला चिकन लेग पीस तर मिळाला नाही, मात्र तंदूरी चिकन टिक्क्याचा वापर केला आहे. सुरूवातीला विचार केला हे नक्कीच ट्राय करायला पाहिजे का ? मात्र नंतर मला ते खूपच आवडले.

एका युजरने लिहिले की, हे काय दाखवले ? कृपया जगावर दया कर आणि जेवणाला स्वादिष्टच राहूदे. काहींनी तर अशा व्हिडीओंवर बंदी आणावी अशी देखील मागणी केली.