TikTok वर बॉलीवूडच्या मस्तानीची धमाकेदार एंट्री


अनेक बॉलीवूड सेलिब्रेटी, राजकारणी, खेळाडू प्रत्येकजण सोशल मीडियावर सक्रिय राहण्याचा प्रयत्न करतात. त्यातच आता बॉलीवूडची मस्तानी अर्थात दीपिका पादुकोणने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टिक टॉकवर धमाकेदार एन्ट्री केली आहे.

@deepikapadukone

Hope I’m not too late to the party!🎉@riyaz.14 @awezdarbar

♬ original sound – deepikapadukone


आपल्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी दीपिकाने टीकटॉकवर आपला पहिला व्हिडिओ शेअर केला आहे. तिच्या टीकटॉक पदार्पणानंतर दीपिकाच्या चाहत्यांनी तिला शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे. टीकटॉकवर दीपिकाची एन्ट्री होताच केवळ १२ तासांच्या आत तिला १२ लाख लोकांनी फॉलो केले आहे. आता तिच्या फॉलोअर्सची संख्या ३० लाखांहून अधिक झाली आहे.

@deepikapadukone

Thank you for your constant love and support…❤ @awezdarbar @nagmaa @faby_makeupartist @motivationkimachine @ur_smartmaker @gunjanshouts @mr.mnv

♬ original sound – deepikapadukone


तिच्या अधिकृत टीकटॉक हँडलवरुन दीपिकाने दोन टीकटॉकर्ससह, एक व्हिडिओ शेअर केला आहे. दीपिका या व्हिडिओमधून ती या प्लॅटफॉर्मचा हिस्सा बनली असल्याचे सांगत आहे. आतापर्यंत ३० लाखांहून अधिकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. टीकटॉकवर दीपिकाने आतापर्यंत ११ व्हिडिओ पोस्ट केले आहेत. दीपिकाने लक्ष्मी अग्रवालसोबतचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे. बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्राने दीपिकाच्याआधी टीकटॉकवर एन्ट्री केली होती. दीपिका सध्या तिच्या आगामी ‘छपाक’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

Leave a Comment