गेली अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात सत्ता स्थापनेवरून काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरू असताना भाजपने सगळ्यांना धक्का देत राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार यांच्या पाठिंब्याने सत्ता स्थापन केली आहे. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या हा वैयक्तिक निर्णय असून याला आमचा पाठिंबा नसल्याचे म्हटले आहे.
अजित पवारांचा वैयक्तिक निर्णय, राष्ट्रवादीचा पाठिंबा नाही – शरद पवार
अजित पवार यांच्या राजकीय निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा नाही.
हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे.— Sharad Pawar (@PawarSpeaks) November 23, 2019
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विट करत याबाबत आपले म्हणणे मांडले.
काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करणार असे जवळपास निश्चित झाले होते. मात्र एका रात्रीत घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर सकाळी 8 वाजता फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची व अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.
Sanjay Raut,Shiv Sena: Kal 9 baje tak ye mahashaye(Ajit Pawar) hamare saath baithe the, achanak se ghayab ho gaye baad mein, vo nazar se nazar mila kar baat nahi kar rahe the, us se hume shaq bhi hua tha pic.twitter.com/l1kzrs1X8D
— ANI (@ANI) November 23, 2019
हा पाठीत खंजिर खूपसण्याचा प्रकार असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. शिवेसना नेते संजय राऊत म्हणाले की, अजित पवार रात्री बैठकीला उपस्थित होते. मात्र अचानक रात्री त्यांचा फोन बंद येत होता. राष्ट्रवादीला देखील अचानक काय घडले हे माहीती नाही.
Sanjay Raut,Shiv Sena: Uddhav Thackeray ji and Sharad Pawar ji are in touch and will meet also today, they might also address the media together. But fact is that Ajit Pawar and the MLAs supporting him have insulted Chhatrapati Shivaji Maharaj and Maharashtra pic.twitter.com/p6aly4PGRd
— ANI (@ANI) November 23, 2019
राऊत म्हणाले की, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे पत्रकार परिषद घेतील. ते म्हणाले, अजित पवारांच्या निर्णयाशी शरद पवार यांचे काहीही देणेघेणे नाही. अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान केला आहे.
