महाराष्ट्रातील उलटफेरानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पूर

महिनाभर चाललेल्या घडामोडीनंतर आता अखेर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपने पुन्हा एकदा महाराष्ट्रात सरकार स्थापन केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पाठिंब्याने भाजपने सरकार स्थापन केले आहे. आज सकाळी 8 वाजता फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र असे असले तरी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांच्या या निर्णयाला पक्षाचा पाठिंबा नसल्याचे म्हटले आहे.

आदल्या दिवशीच शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना-काँग्रेस सरकार स्थापन करेल, असे म्हटले होते. मात्र एका रात्रीत महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा उलटफेर पाहायला मिळाला. या घटनेनंतर सोशल मीडियावर मीम्सचा पूरच आला आहे. युजर्स केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांच्या चाणक्यनितीचे कौतूक करत आहेत, तर शिवसेनेची खिल्ली उडवत आहेत.

पहा युजर्सनी शेअर केलेले मीम्स –

जो झोपतो, तो गमवतो.

“तथाकथित”

‘महाराष्ट्रात सर्जिकल स्ट्राईक’

एका रात्रीत खेळ बदलला.

Leave a Comment