जान्हवीचे या कामामुळे होत आहे सोशल मीडियात कौतुक


जाहन्वी कपूरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये जाहन्वीने एका भुकेल्या मुलाला पाहिल्यानंतर ताबडतोब कारकडे जात कारमध्ये असलेली बिस्कीटे त्याला खायला दिली. जाहन्वी कपूरच्या या कामाचे सोशल मीडियात कौतुक होत आहे. तथापि असे करणारी जान्हवी काही पहिलीच बॉलीवूड कलाकार नाही. तिच्यापूर्वी देखील अनेक बॉलीवूड कलाकारांनी असे काम केले आहे.

जाहन्वी कपूरचा हा व्हिडिओ प्रसिद्ध छायाचित्रकार विराल भयानी यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पहात आहात की जाहन्वीने वनपीस ड्रेस परिधान केला आहे. जाहन्वीची कार पाहून एक भुकेलेला मुलगा तिच्याकडे आला. मुलाला असे पाहून, जाहन्वी स्वत: ला रोखू शकली नाही आणि आपल्या गाडीजवळ गेली.


जाहन्वीने कारमधून बिस्कीटची दोन पाकिटे काढते आणि प्रेमाने ती मुलाच्या हातात ठेवते. जाहन्वीचा हा व्हिडिओ वांद्रेच्या सलूनच्या बाहेरचा आहे. या व्हिडिओपूर्वी जाहन्वीच्या पांढर्‍या साडी लूकची खूप चर्चा झाली होती. जाहन्वीचा हा लूक दिवाळी पार्टीचा होता. जान्हवीने पांढऱ्याया रंगाच्या साडीसह बॅकलेस ब्लाउज परिधान केला होता ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. जान्हवीने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांनी तिच्यावर लाईक्स पाऊस पाडण्यास सुरुवात केली.

एका वापरकर्त्याने लिहिले, जान्हवी तू पांढऱ्या साडीमध्ये खुप हॉट दिसत आहेस. त्याचवेळी एका वापरकर्त्याने लिहिले, जान्हवी, तू माझ्याशी लग्न करशील का? तर एकाने लिहिले- तू तुझ्या आईसारखीच सुंदर आहेस. जान्हवीचे हे फोटो पाहून वापरकर्त्याने लिहिले- म्हणजे एखादी व्यक्ती इतकी सुंदर कशी दिसते?

Leave a Comment