कंटेनर्सचा वापर करत या पठ्ठ्याने उभारला तीन मजल्यांचा आशियाना

घर बनविणे आणि त्याला सजवणे हे अवघड काम असते. प्रत्येकाला स्वतःचे एक हक्काचे घर हवे असते. टेक्सासमधील हॉस्टन येथे राहणाऱ्या विल ब्रेउक्सने देखील आपल्या स्वप्नातील घर बनविले आहे. मात्र हे घर इतरांपेक्षा वेगळे आहे. त्याने विट आणि सिमेंट ऐवजी थेट शिपिंग कंटेनर्सचा वापर करून घर तयार केले आहे.

(Source)

11 शिपिंग कंटेनर्सद्वारे हे तीन मजली घर बनविण्यात आले आहे. 2500 स्केअर फूटमध्ये पसरलेले हे घर पुर्ण फर्निच्ड आहे.

(Source)

विलला हवे तसे घर बनवून देणारा डिझाईनर शोधण्यास खूप अडचणी आल्या.  मात्र त्याला डिझाईनर सापडला नाही. अखेर त्याने स्वतः 2011 मध्ये घर बनिवण्याचा निर्णय घेतला.

(Source)

सर्वात विलने घराचे थ्रिडी स्केच तयार केले व त्यानंतर त्याला बनविण्याचे काम सुरू केले. आज विल या तीन मजली हटके घराचा मालक आहे.

(Source)

विलने घर बनविण्यासाठी कंटेनर्सची निवड केली कारण कंटेनर्स मजबूत असतात. आग, वादळ, पाणी कशाचाच त्याच्यावर परिणाम होत नाही. याशिवाय हे कंटेनर अनेक वर्ष टिकते.

 

Leave a Comment