बगदादीला शोधण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या श्वानाचे ट्रम्प यांनी केले कौतुक


अमेरिकेने इसिसचा म्होरक्या असलेला अबु अल् बगदादी ठार झाला असल्याची घोषणा केली. रविवारी सकाळी व्हाइट हाऊसमधून बगदादी ठार झाल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले. ट्रम्प यांनी त्यानंतर आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एका श्वानाचा फोटो शेअर केला आहे. बगदादीला ठार करण्यात या श्वानामुळे मोठी मदत झाली अशी माहिती ट्रम्प यांनी दिली. या श्वानाची अबु अल बगदादीला शोधण्यात आणि त्याचा खात्मा करण्यात खूप मदत झाली. खूप मोठी कामगिरी या श्वानाने पार पाडली अशा शब्दात ट्रम्प यांनी श्वानाचे कौतुक केले आहे.


एका भुयारात दडून बसलेल्या बगदादीला अमेरिकन सुरक्षा दलाच्या श्वानांनी शोधून काढल्यानंतर अंगावरील स्फोटकांच्या जॅकटचा स्फोट घडवून बगदादीने आत्महत्या केली. श्वान या स्फोटात जखमी झाला आहे. सध्या त्याच्यावर इलाज सुरू आहे. लवकरच तो सेवेत रुजू होणार आहे. सुरक्षेच्या कारणावरुन नावासह श्वानाची कोणतीही माहिती समोर आणली जाणार नाही असे अमेरिकेच्या सुरक्षा प्रमुखांनी सांगितले.

Leave a Comment