अ‍ॅपलचे बहुप्रतिक्षीत ‘एअरपॉड्स प्रो’ बाजारात दाखल

अ‍ॅपलने आपले बहुप्रतिक्षीत एअरपॉड्स प्रो अखेर लाँच केले आहेत. या एअरपॉड्समध्ये अ‍ॅक्टिव नॉइज कँन्सलेशन आणि वॉटर रेझिडन्स सारखे फीचर दिले आहेत. भारतात या एअरपॉड्सची किंमत 24,900 रूपये आहे.

30 ऑक्टोंबरपासून अमेरिकेत याची विक्री सुरू होईल. भारतात लवकरच हे एअरपॉडस् विक्री केले जातील, अशी माहिती कंपनीने दिली आहे.

(Source)

कंपनीने या एअरपॉड्स प्रोमध्ये एच 1 चिप दिली आहे. जी 10 ऑडिओ कोर सुविधा देते. याशिवाय युजर्सला सीरी सपोर्ट देखील मिळेल. यामध्ये नॉइज कँन्सिलेशनचे खास फीचर्स देण्यात आलेले आहे. यामुळे युजर्सला बाहेरील आवाज ऐकू येणार नाही. याशिवाय याच युजर्सला यात कॉल रिसिव्ह आणि कट करण्याचे फीचर मिळेल. याशिवाय गाणे चालू-बंद करण्यास, दुसरे गाणे लावण्यास देखील ट्रांसफ्रेंसी मोड देण्यात आला आहे.

याशिवाय यात एअर फीट टीप टेस्ट हे नवीन फीचर देण्यात आले आहे. यानुसार, कानात एअरपॉड्स फीट बसले की नाही याची देखील माहिती मिळेल.

 

Leave a Comment