भारतीयांचा मेंदू इतरांच्या तुलनेत लहान, रिपोर्टमध्ये दावा

इंटरनॅशनल इंस्टिट्यूट ऑफ इनफॉर्मेशन टेक्नोलॉजीच्या (हैदराबाद) संशोधकांनी भारतीय लोकांच्या मेंदूवर खास रिसर्च केला आहे. या रिसर्चमध्ये सांगण्यात आले आहे की, भारतीय लोकांच्या मेंदूचा आकार आणि वॉल्यूम पश्चिम आणि पुर्वेकडील देशांतील लोकांच्या तुलनेत लहान आहे. मेंदूच्या डिझाईनबद्दल हा रिसर्च न्यूरॉलॉजी इंडियामध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.

मेंदूशी निगडीत गंभीर आजारांना समोर ठेऊन हा रिसर्च करण्यात आला.  सांगण्यात येत आहे की, यानंतर मेंदूशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी मदत होईल. या प्रोजेक्टवर काम करणाऱ्या जयंती सिवास्वामी यांच्यानुसार, मेंदूशी संबंधित आजार मॉनिटर करण्यासाठी मॉन्ट्रियल न्यूरोलिजिकल इंस्टिट्यूट (एमएनआय) टेम्पलेटचा वापर करण्यात येतो.

जयंती सिवास्वामी यांच्यानुसार, भारतीय लोकांच्या मेंदूचा आकार हा एमएनआयच्या तुलनेत लहान आहे. ही गोष्ट वेगवेगळे स्कॅन करण्यात आल्यानंतर समोर आली आहे. अशावेळी एमएनआयद्वारे भारतीय मेंदूची तपासणी करणे हे चुकीचे ठरते.

जयंती यांनी पुढे सांगितले की, मेंदूच्या आकाराबद्दल आतापर्यंत जे टेम्पलेट बनवण्यात आले त्यात चीनी आणि कोरियन टेम्पलेटचा देखील समावेश आहे. मात्र भारतातील विशिष्ट लोकांसाठी योग्य आकाराचे टेम्पलेट बनविण्यात आलेले नाही. हैदराबाद आयआयटीने या दिशेत पहिले पाऊल टाकले आहे. जेणेकरून भारतीय मेंदूसाठी डिझाईन तयार करण्यात येईल.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment