
नुकताच ‘उजडा चमन’ या विनोदी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला असून या चित्रपटाची निर्मिती ‘प्यार का पंचनामा’ चित्रपटाचे दोन अफलातून भाग बनवणाऱ्या निर्मात्यांकडून करण्यात आली आहे. चित्रपट अत्यंत चटपटीत संवाद, प्रासंगिक विनोद आणि कलाकारांचे अचूक टायमिंग यामुळे विषय हाताळण्यात नक्कीच यशस्वी होईल याची खात्री ट्रेलर पाहताना येते.
एका ३० वर्षीय चमन कोहली या अविवाहित तरुणाची ‘उजडा चमन’ ही गोष्ट आहे. कॉलेजमध्ये तो लेक्चरर आहे. परंतु, अवेळी आलेल्या केसगळतीच्या समस्येने तो वैतागला असून अचानक सुंदर पत्नीचे स्वप्न पाहणाऱ्या या चमन कोहलीच्या आयुष्यात एक संकट निर्माण होते. जर ३१ व्या वाढदिवसाच्या अगोदर लग्न झाले नाही तर मुलगा आयुष्यभर अविवाहित राहील अशा प्रकारचे भाकित भविष्यवेत्त्याने वर्तवले असल्यामुळे त्याचे उडालेली धांदल या चित्रपटात चित्रीत करण्यात आली आहे.
‘उजडा चमन’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला
सनी सिंग, मानवी गग्रो, करिश्मा शर्मा आणि ऐश्वर्या साकुजा यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक पाठक यांनी केले आहे. ”उजडा चमन’ ८ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
