गांधी जयंतीच्या शुभेच्छा दिल्याने ट्रोल झाले शास्त्री बुवा


विशाखापट्टणम – राष्ट्रपिता महात्मा गांधीची १५० वी जयंती आज जगभरामध्ये उत्साहात साजरी केली जात आहे. विविध कार्यक्रमांचे आयोजन देशभरामध्येही करण्यात आले आहे. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी गांधींच्या १५० व्या जयंतीनिमित्त ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला. त्यांनी या व्हिडिओमध्ये लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मोहिमेत सामील होण्याचे आवाहन केले. पण, नेटकऱ्यांनी त्यांचीच फिरकी घेतली आहे.


शास्त्रींनी या व्हिडिओद्वारे ‘फिट इंडिया’ आणि ‘स्वच्छ भारत’ या दोन्ही अभियानात देशभरातील नागरिकांना सहभागी होण्यास सांगितले. पण शास्त्रींनाच नेटकऱ्यांनी आज ‘ड्राय डे’ आहे म्हणत ट्रोल केले आहे.


आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत बरोबरी राखल्यानंतर, आज भारतीय संघाने आपल्या कसोटीच्या अभियानाला सुरुवात केली आहे. विशाखापट्टणम येथील एसीए-वीडीसीए स्टेडियमवर भारताने नाणेफेक जिंकली असून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. तीन सामन्याच्या या कसोटी मालिकेत आघाडी घेण्याचा दोन्ही संघांचा मानस असणार आहे.

Leave a Comment