पाहा ‘दबंग ३’मधील ‘चुलबूल पांडे’ची दमदार झलक


‘दबंग ३’ चित्रपटातून बॉलिवूडचा ‘दबंग’ स्टार सलमान खान प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘दबंग’ मध्ये त्याने साकारलेली ‘चुलबूल पांडे’ची भूमिका चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरली होती. त्याची हिच दमदार झलक ‘दबंग ३’मध्येही पाहायला मिळणार आहे. या चित्रपटातील एक व्हिडिओ नुकताच शेअर करण्यात आला आहे. ‘चुलबूल पांडे’ची खास ओळख यामध्ये करुन देण्यात आली आहे.

सोशल मीडियावर ‘दबंग ३’च्या सेटवरुन आत्तापर्यंत बरेचसे फोटो व्हायरल झाले आहेत. या चित्रपटाचे अपडेट्सही वेळोवेळी सलमान खानने चाहत्यांशी शेअर केले आहेत. त्याने हा व्हिडिओ ‘स्वागत नहीं करोगे हमारा’, असे कॅप्शन देत शेअर केला आहे. या व्हिडिओत नेहमीप्रमाणेच सलमानच्या खास अंदाजात ‘चुलबूल पांडे’ची ही झलक पाहायला मिळते.


अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा या चित्रपटात ‘रज्जो’ची भूमिका साकारत आहे. तसेच या चित्रपटात महेश मांजरेकर यांची मुलगी सई हिचीदेखील मुख्य भूमिका आहे. सलमान खानने आयफा अवार्ड्स सोहळ्यात सईची सर्वांना ओळख करुन दिली. या चित्रपटात तिची आणि सलमान खानची केमेस्ट्री पाहायला मिळणार आहे. प्रभू देवा या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत आणि हा चित्रपट २० डिसेंबरला रिलीज होईल.

Leave a Comment