
थरारक भयपटांसाठी दिग्दर्शक विक्रम भट्ट हे ओळखले जातात. लवकरच ‘१९२०’ आणि ‘हाँटेड’ यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे विक्रम भट्ट यांचा ‘घोस्ट’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.
विक्रम भट्ट यांच्या नव्या हॉरर चित्रपटाचा ट्रेलर रिलीज
चित्रपटाच्या ट्रेलरवरुनच अंगावर काटे ऊभे राहतात. हा चित्रपट तयार करण्याची सुरुवात २०११ सालीच झाली होती. छोट्या पडद्यावरील सनाया ईरानी ही अभिनेत्री या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर, यामध्ये शिवम भार्गव हा अभिनेताही झळकणार आहे. या चित्रपटात विक्रम भट्ट स्वत:ही महत्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.
विक्रम भट्ट यांची अंत्यत वेगळी वाट चोखाळणारे दिग्दर्शक अशी ओळख आहे. त्यांनी आजवर ३० हून अधिक चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. त्यांनी असंख्य चित्रपटांचे लेखन केले. सुमारे २५ वेब सिरीज त्यांच्या नावावर आहेत. हा चित्रपट पुढील महिन्याच्या १८ ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरची लिंक विक्रम भट्ट यांनीही सोशल मीडियावर शेअर केली आहे.
