हार्दिक पांड्या दिली प्रेमाची कबुली


वेळोवेळी क्रिकेट आणि बॉलीवूड यांचे नाते समोर येत असते. बॉलिवूडच्या काही अभिनेत्रींशी बऱ्याच क्रिकेटपटुंची नावे जोडली गेली आहेत. दरम्यान अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि क्रिकेटर हार्दिक पांड्या हे देखील काही दिवसांपूर्वी रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चा होत्या. पण हार्दिकने आता स्वत: आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे.

पण यावेळी उर्वशी रौतेला सोबत नाही तर, हार्दिकचे नाव नताशा स्टॅनकोव्हिकशी जोडले गेले आहे. हार्दिकने आपल्या इंन्स्टाग्रामवरून रविवारी एक फोटो शेअर केला होता. त्याने त्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये मी प्रेमात असल्याचे लिहिले होते. नताशाने त्यावर त्याला तुच प्रेम आहेस, असे म्हटले आहे.

अनेक वेळा नताशासोबत हार्दिक दिसला होता. त्याचबरोबर त्याने तिची ओळख आपल्या कुटुंबियांशी सुद्धा करून दिली होती. नताशा ही मुळची सर्बियाची असून तिने ‘नच बलिए’च्या ९ व्या सीजनमध्ये भाग घेतला होता. यापूर्वी हार्दिकचे अभिनेत्री ईशा गुप्ता हिच्यासोबतही नाव जोडले गेले होते. एकेकाळी ईशा आणि हार्दिक एकमेकांना डेट करत असल्याच्याही चर्चा झाल्या होत्या. पण दोघांनीही त्यांच्या नात्याबाबत मौन राखणेच पसंत केले होते. आता हार्दिकच्या आयुष्यात नताशाच्या रुपाने नवे प्रेम बहरले आहे.

Leave a Comment