लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला अभिनेता कुणाल खेमू, रसिका दुग्गल, रणवीर शौरी, आणि विजय राज यांची मुख्य भूमिका असलेला ‘लूटकेस’ हा चित्रपट येणार आहे. अलिकडेच या चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर कुणाल खेमूने केला होता. त्याचबरोबर चित्रपटातील इतर कलाकारांची झलकही समोर आली होती. या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलरही आता नुकताच रिलीज करण्यात आला आहे.
पैशांची सुटकेस शोधण्यासाठी काय काय खेळ रंगतात याची झलक ‘लूटकेस’च्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते.
Trailer of #Lootcase… Stars Kunal Kemmu, Rasika Dugal, Gajraj Rao, Ranvir Shorey and Vijay Raaz… Directed by Rajesh Krishnan… Presented by Fox Star Studios… 11 Oct 2019 release… #LootcaseTrailer: https://t.co/5Wx1QD6ioi pic.twitter.com/jtcRCaqwMs
— taran adarsh (@taran_adarsh) September 19, 2019
लूटमारीवर आधारित कॉमेडी चित्रपट असा हा चित्रपट असणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजेश क्रिश्नन हे करत आहेत. तर, या चित्रपटाची निर्मिती फॉक्स स्टार स्टूडिओझ अंतर्गत करण्यात येत आहे. हा चित्रपट ११ ऑक्टोंबरला रिलीज करण्यात होणार आहे.