
सध्या सिनेरसिकांमध्ये ‘शुभमंगल ज्यादा सावधान’ या नव्या चित्रपटाची चर्चा जोरात आहे. सलग हिट चित्रपट आयुष्यमान खुराणाच्या नावावर येत आहेत. त्याचे मागील वर्षात अंधाधुन आणि बधाई हे दोन चित्रपट हिट झाले तर २०१९ मध्ये आर्टीकल 15 आणि ड्रीम गर्ल हिट झाला. त्याचा नवा चित्रपट आता प्रदर्शनाच्या मार्गावर आहे आणि ‘शुभमंगल ज्यादा सावधान’ असे याचे शीर्षक आहे .
पहा ‘शुभमंगल ज्यादा सावधान’मधील कलाकारांची एक झलक
‘शुभ मंगल सावधान’ या चित्रपटाला मिळालेल्या तुफान यशानंतर त्याचा दुसरा भाग येत आहे. या चित्रपटात आयुष्यमान खुराणा आणि भूमी पेडणेकर यांची जोडी पुन्हा पाहायला मिळेल.
Ayushmann Khurrana… Now meet the #ShubhMangalZyadaSaavdhan family… Directed by Hitesh Kewalya… Produced by Bhushan Kumar and Aanand L Rai… 13 March 2020 release. pic.twitter.com/YWCLCocREE
— taran adarsh (@taran_adarsh) September 19, 2019
‘शुभमंगल ज्यादा सावधान’ चित्रपटाच्या व्यक्तीरेखा कोण असतील याचा उलगडा ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्विट करुन केला आहे. ही फॅमिली कोण याचा खुलासा अॅनिमेशनच्या माध्यमातून करण्यात आला आहे. ‘शुभमंगल ज्यादा सावधान’ या चित्रपटाचे दिग्दर्शन हितेश केवल्या यांनी केले आहे. हा चित्रपट १३ मार्च २०२० रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
