सोशल मीडियावर तुफान स्टंट्स असणारे व्हिडीओ रोज व्हायरल होत आहे. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून, बघणाऱ्या प्रत्येकाला हा व्हिडीओ आवडत आहे.
व्हिडीओ व्हायरल : चक्क चालत्या गाडीचा टायर बदलला
या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती चालत्या गाडीचा टायर बदल आहे. हा व्हिडीओ कधीचा व कुठला आहे हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, भारतीय युजर्स हा व्हिडीओ तुफान शेअर करत आहे.
हम चदंरयान का लैडर भी ठीक कर लेगे 👶😁 pic.twitter.com/kPuhfh79E1
— हैरी 🚩 (@harisbhadra) September 11, 2019
व्हिडीओ शेअर करताना युजरने लिहिले की, आपण चांद्रयानाचे लँडर देखील दुरुस्त करू. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक रिक्षाचालकाच्या गाडीचा टायर चालताना पंचर होतो. त्यानंतर तो चालक गाडीला दोन चाकांवर उभे करत चाक बदलू लागतो. या गाडीच्या मागे असलेल्या ड्रायव्हरने हा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे.
