केट मिडलटन नाही, तर मेघन मार्कल आहे का राणी एलिझाबेथची अधिक लाडकी?

queen
ब्रिटीश राजघराण्यातील या दोन्ही सदस्यांचे आपापसात अनेक गोष्टींवर मतभेद असल्याची अनेक वृत्त प्रसारमाध्यमांच्या द्वारे अलीकडच्या काळामध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहेत. केट मिडलटन आणि मेघन मार्कल या त्या दोघी अतिशय लोकप्रिय शाही सदस्य आहेत. या दोघींमध्ये अनेक वैचारिक मतभेद, मेघन आणि प्रिन्स हॅरीच्या विवाहाच्या काही काळ आधीपासूनच सुरु असल्याचे समजते. तसेच प्रिन्स हॅरी आणि प्रिन्स विलियम यांच्यातही काही मतभेद असल्याचे वृत्त असून, याच कारणांमुळे मेघन आणि हॅरी केन्सिंग्टन पॅलेस येथे न राहता लवकरच फ्रॉगमोर कॉटेज येथे मुकाम हलविणार असल्याचे निश्चित वृत्त आहे.


केट आणि मेघनमध्ये ‘शीतयुद्ध’ सुरु असतानाच, मेघन मार्कल राणी एलिझाबेथची अधिक लाडकी असल्याचे वृत्त आले आहे. केट मिडलटनच्या मानाने राणी एलिझाबेथ मेघन मार्कलला अधिक पसंत करीत असल्याच्या या वृत्ताने या दोधींमधील मतभेद आणखीनच चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बकिंगहॅम पॅलेसच्या वतीने नाताळच्या निमित्ताने ‘बेस्ट मोमेंट्स ऑफ २०१८’ दर्शविणारी अनेक छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली असून, राणी एलिझाबेथ सहभागी झालेल्या अनेक कार्यक्रमांची छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली आहेत.
queen1
या छायाचित्रांमध्ये राणी एलिझाबेथची मेघन मार्कल सोबतची अनेक छायाचित्रे असून, यातील एकाही छायाचित्रामध्ये केट मिडलटन नाही. तसेच काही औपचारिक कार्यक्रमांमध्ये सहभागी झालेल्या राणी एलिझाबेथ आणि मेघन मार्कल एकमेकींच्या संगतीत अतिशय आनंदातही दिसत आहेत. यातील एक औपचारिक कार्यक्रमाच्या निमित्ताने राणी एलिझाबेथने मेघनला अतिशय मौल्यवान हिरेजडीत कर्णभूषणे भेट म्हणून दिली आहेत. आणि म्हणूनच राणी एलिझाबेथची पसंती केटच्या मानाने मेघनला अधिक असेल काय, याबद्दल निरनिराळे कयास लावले जात आहेत.