बाटलीच्या झाकणामुळे वाचले दरीत अडकलेल्या कुटुंबाचे प्राण

अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये 40 फूट खोल दरीत अडकलेल्या कुटुंबाचे प्राण एका बॉटलच्या झाकणामुळे वाचले आहेत. कर्टिस विटसन, त्यांची पत्नी आणि त्यांचा 13 वर्षांचा मुलगा कॅलिफोर्निया येथे फिरायला आले होते. यावेळी एका दरीतून, अरोयो सेको नदीजवळ आणि तेथून झऱ्यापर्यंत जाणार होते. मात्र प्रवासाच्या तिसऱ्या दिवशी ते दोन्ही बाजूला 40 फूट उंचच उंच भिंती असलेल्या दरीत अडकले. त्यांच्याकडे बाहेर निघण्यासाठी दोरी देखील नव्हती.

कर्टिस यांना सुरूवातीला काहीही सुचत नव्हते. मात्र नंतर त्यांना बाटलीच्या झाकणावर ‘हेल्प’ लिहले व एका कागदावर मेसेज लिहिला की, ‘आम्ही येथे एका दरीत अडकलो आहोत. आमची मदत करा.’ हा संदेश बाटलीमध्ये टाकत झऱ्याच्या प्रवाहात त्यांनी बॉटल टाकली.

(Source)

कर्टिस यांनी टाकलेली ही बाटली 400 मीटर दूर वाहत जाऊन हायकर्सच्या एका ग्रुपला सापडली. त्यानंतर या ग्रुपने कर्टिस यांच्या कुटुंबाचा शोध घेत त्यांना वाचवले. कर्टिस सांगतात की, ते तब्बल 4 तास त्या दरीत अडकले होते. आमचे नशीब चांगले होते की, आमची बाटली कोणाला तरी सापडली.

 

Leave a Comment