आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी पाहिला ‘साहो’चा ट्रेलर

साउथचा सुपरस्टार प्रभास आणि अभिनेत्री श्रध्दा कपूर यांचा मोस्ट अवेटिड चित्रपट ‘साहो’चा ट्रेलर रिलीज झाला आहे. जबरदस्त एक्शन असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. 10 ऑगस्टला रिलीज झालेल्या ट्रेलरला आतापर्यंत 1 करोड 49 लाख वेळा बघितले गेले आहे. या ट्रेलरमध्ये प्रभास आणि श्रध्दा कपूरच्या लवस्टोरीबरोबरच एक्शन आणि स्टंट देखील पाहायला मिळत असून, लोकांना ते आवडत आहे. ‘बाहुबली’नंतर प्रभास आता या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे.

चित्रपटाची प्रदर्शित तारीख देखील बदलण्यात आली आहे. आधी चित्रपट स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी 15 ऑगस्टला प्रदर्शित होणार होता. मात्र आता 30 ऑगस्टला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

प्रभास आणि श्रध्दा कपूर ‘साहो’च्या निमित्ताने पहिल्यांदाच चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. तसेच हा चित्रपट हिंदी, तेलगू आणि तामिळ या तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. साहोमध्ये प्रभास, श्रध्दा कपूर यांच्या व्यतरिक्त नील नितीन मुकेश, जँकी श्रॉफ, मंदिरा बेदी, महेश मांजरेकर, चंकी पांडे, अरूण विजय आणि मुरली शर्मा हे देखील दिसणार आहेत.