
जशी राजकीय वर्तुळात महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चर्चा रंगत असते, तशीच संगीत क्षेत्रात त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची चर्चा होत असते. अमृता फडणवीस या एक उत्तम गायिका असल्याचे आपण अनेक ऐकले आणि पाहिले देखील असेल. याचा नव्याने प्रत्यय देणारे त्यांचे एक गाणे आज रिलीज करण्यात आहे. ‘तेरी बन जाऊंगी’ असे या गाण्याचे बोल आहेत.
तत्पूर्वी शनिवारी अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटरवर याबाबत पोस्ट करत माहिती दिली होती. या गाण्याची निर्मिती गुलशन कुमार यांच्या टी सिरीजच्या अंतर्गत करण्यात आली आहे. या गाण्याद्वारे आता पुन्हा एकदा चाहत्यांना अमृता यांच्या आवाजाची पर्वणी ऐकायला मिळणार आहे. नेहमीप्रमाणेच या गाण्यातही अमृता फडणवीस यांचा यांचा ग्लॅमरस अंदाज या गाण्याला चार चांद लावत आहे.
तुम्ही ऐकले आहे का सौ. फडणवीसांच्या आवाजातील ‘तेरी बन जाऊंगी’ गाणे ?
दरम्यान टी सिरीजने याआधीही अमृता यांच्या काही गाण्यांची निर्मिती केली होती. अमृता फडणवीस आणि बी. प्राक (B Praak) यांना टी सिरीजच्या MixTape Season 2 मध्ये गाण्याची संधी देण्यात आली होती. तर दोन वर्षांपूर्वी अमिताभ बच्चन यांची भूमिका असलेले ‘फिर से’ गाणे प्रदर्शित झाले होते. या गाण्याला अमृता फडणवीस यांनी आपला आवाज दिला होता.
