
आजवर बॉलिवूडच्या बऱ्याच चित्रपटांमध्ये अभिनेता सुनील शेट्टीने भूमिका साकारल्या आहेत. तो आता पुन्हा एकदा ‘पेहलवान’ या चित्रपटातून पडद्यावर झळकणार आहे. त्याचा या चित्रपटातील फर्स्ट लूक नुकताच रिलीज करण्यात आला होता. या चित्रपटातील पहिले गाणे देखील आता रिलीज करण्यात आले आहे.
‘पेहलवान’ हा बहुभाषिक चित्रपट असून हा चित्रपट तब्बल ५ भाषांमध्ये प्रेक्षकांना पाहता येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन दाक्षिणात्य दिग्दर्शक क्रिश्ना हे करत आहेत. त्याची या चित्रपटात साऊथचा सुपरस्टार विलन सुदीप याच्यासोबत जुगलबंदी रंगणार आहे. नुकतेच ‘जय हो पेहलवान’ हे पहिले गाणे रिलीज करण्यात आले आहे. दोघांचीही जबरदस्त अॅक्शन या गाण्यात पाहायला मिळते.
सुनील शेट्टीच्या ‘पेहलवान’चे पहिले गाणे रिलीज
तब्बल ५०० डान्सर्सला घेऊन ‘जय हो पेहलवान’ हे गाणे तयार करण्यात आले आहे. या गाण्याला गणेश आचार्य यांनी कोरियोग्राफ केले आहे. तर हे गाणे व्यास राज, देव नागी आणि अमृता यांनी गायले आहे. तमिळ, तेलुगू, कन्नडा, हिंदी आणि मल्याळम या भाषांमध्ये हा चित्रपट रिलीज होणार आहे. २५०० स्क्रिन्सवर हा चित्रपट रिलीज होईल.
