पुन्हा एकदा समलैंगिकतेवर आधारित चित्रपटात झळकणार शबाना आझमी


आगामी ‘शिरकुर्मा’ या चित्रपटात बॉलिवूडची ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांची वर्णी लागली आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. या चित्रपटाची कथा समलैंगिकता या विषयावर आधारित आहे.


समलैंगिकतेवर आधारित बरेच चित्रपट आत्तापर्यंत बॉलिवूडमध्ये तयार झाले. प्रेक्षकांवरही या चित्रपटांचा प्रभाव दिसू लागला आहे. त्यामुळे अशा विषयांवर प्रकाश टाकण्यासाठी नवनव्या चित्रपटांची निर्मिती करण्यात येत आहे. त्यापैकीच एक ‘शिरकुर्मा’ आहे.

अभिनेत्री स्वरा भास्कर आणि दिव्या दत्ता या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. तर, चित्रपटात सुरेखा शिखरी यांचीही महत्वपूर्ण भूमिका राहणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन फराज अन्सारी हे करत आहेत. चित्रपटाच्या शूटिंगला लवकरच सुरूवात होणार आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

Leave a Comment