बीसीसीआयने 8 महिन्यासाठी पृथ्वी शॉला केले निलंबित, पण का…?


नवी दिल्ली – डोपिंग चाचणीत भारताचा उद्योन्मुख युवा खेळाडू पृथ्वी शॉ दोषी आढळल्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) त्याला आठ महिन्यासाठी निलंबित केले आहे. आता 15 नोव्हेंबर 2019 पर्यंत पृथ्वी क्रिकेट खेळू शकणार नाही.

यासंदर्भात बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, पृथ्वी शॉ याची फेब्रुवारी 2019 मध्ये सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेदरम्यान डोपिंग चाचणी घेण्यात आली होती. पृथ्वी या चाचणीत दोषी आढळल्यामुळे त्याचे आठ महिन्यासाठी निलंबन करण्यात आले आहे.

पृथ्वी शॉने 16 जुलैला डोपिंगमध्ये बंदी असलेला घटक आढळून आल्यानंतर स्पष्टीकरण दिले. हे कृत्य माझ्या हातून जाणूनबुजून घडलेले नाही. तर माझ्या शरीरात कफ सिरप घेताना त्यामध्ये उत्तेजक द्रव्य गेले, असे पृथ्वीने सांगितले. बीसीसीआयने पृथ्वीचे म्हणणे मान्य केले आहे.

पृथ्वी शॉचा आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी जाहीर झालेल्या भारतीय संघात समावेश नसल्याचे पाहून अनेकांना धक्का बसला होता. पण दुखापतीमुळे तो बाहेर असल्याचे सांगण्यात आले. तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दुखापत झाल्यामुळे संघाबाहेर होता. प्रशिक्षण शिबिरात अथवा राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी होण्यापूर्वी खेळाडूंना डोपिंग चाचणी द्यावी लागते. खेळाडू या चाचणीत दोषी आढळल्यास त्याला स्पर्धेतून बाद ठरवले जाते. दरम्यान, ही चाचणी खेळाडूच्या युरीनचे नमुने तपासून घेतली जाते.

Loading RSS Feed

Leave a Comment