अखेर प्रेक्षकांच्या भेटीस कार्टून चित्रपट ‘द अँग्री बर्ड मूवी 2’ चा ट्रेलर आला आहे. चित्रपटाचा इंग्रजी भाषेतील ट्रेलर रिलीज झाला असून कॉमेडियन कपिल शर्माने हिंदी डब असलेल्या यातील रेड या कार्टून व्यक्तीरेखेला आपला आवाज दिला आहे. त्याचबरोबर कपिलच्या टीममधील किकू शारदा आणि अर्चना पुरण सिंग यांनीही चित्रपटाला आपला आवाज दिला आहे.
प्रेक्षकांनी ‘द अँग्री बर्ड’च्या पहिल्या भागाला प्रचंड उचलून धरले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही तूफान कमाई केली होती. चित्रपटाने मुलांसोबतच मोठ्यांनाही वेड लावले होते. हा ट्रेलर ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी शेअर केला आहे.
Kapil Sharma, Kiku Sharda and Archana Puran Singh… Check out their voiceover for the #Hindi version of #TheAngryBirdsMovie2… 23 Aug 2019 release in #Hindi, #English, #Tamil and #Telugu… #Hindi trailer: https://t.co/flNbNRCLrC
— taran adarsh (@taran_adarsh) July 29, 2019
२३ ऑगस्टला ‘द अँग्री बर्ड मूवी 2’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. ट्रेलर रिलीज झाल्यानंतर यूट्यूबवर आता ट्रेंडिंगमध्ये आहे.